जिल्हा विभाजनावर विखे पाटील म्हणाले....

नगर :  जिल्हा विभाजन व शिर्डीतील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांचा काहीही संबंध नाही. जिल्हा निर्मितीचा हा निर्णय नाही. उत्तर नगर जिल्ह्यातील पाच-सात तालुक्यांना विविध शासकीय कामांसाठी सोयीचे व्हावे म्हणून शिर्डीत या कार्यालयाची निर्मिती केली आहे, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी एक अपर जिल्हाधिकारी पद मंजूर करून त्यांच्यासाठी शिर्डी येथे कार्यालय सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेला हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला.

मात्र, शिर्डीत हे कार्यालय होणे म्हणजे जिल्हा विभाजन व नवीन जिल्ह्याचे मुख्यालय शिर्डीत करण्याची योजना असल्याची चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हे तर याच्या निषेधार्थ श्रीरामपूरमधून आज शनिवारी बंदची हाक देण्यात आली आहे. या मुद्यावर आता स्वत: विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.

विखे म्हणाले, शिर्डीतील हे कार्यालय केवळ नागरिकांच्या सोयीसाठी असून जिल्हा विभाजनाचा कोणताही विचार नाही.


विखे यांनी जिल्हा विभाजन होणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी जिल्ह्यात विभाजन होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. श्रीरामपूरकर आक्रमक झालेले आहे. त्यांनी आज बंद आंदोलन पुकारलेले आहे. श्रीरामपूर पाठोपाठ आता इतरही तालुक्यातून जिल्हा विभाजनाचा मुद्दा उपस्थित करून आंदोलन हाती घेतले जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post