नेवासा : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच नेवासा तालुक्याचे विभाजन करत नव्याने सोनई तालुका करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या जिल्हा विभाजन होणार अशा प्रकारची चर्चा चालू असताना त्यामध्ये नवीन तालुक्यांचाही समावेश होणार असल्याचे समजते. यावरून भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेल्या नेवासा तालुक्याचे विभाजन करून नव्याने सोनई तालुका करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सोनई हे विकसित शहर म्हणून उदयास येत आहे. त्याचबरोबर सर्व सुविधा या परिसरात उपलब्ध असून सोनईच्या आसपास असणाऱ्या गावांचा शैक्षणिक ,व्यापार धार्मिक ,असे विविध संबंधाने सतत संपर्क येत असतो.
त्यामुळे घोडेगाव, चांदा ,रस्तापूर, म्हाळस पिंपळगाव ,शहापूर ,महालक्ष्मी हिवरे, देडगाव, माका, पाचुंदा, रांजणगाव, लोहारवाडी, मांडेमोरगव्हाण, वांजोळी, सोनई जवळील करजगाव, पानेगाव, खेडले परमानंद ,कागोणी, हिंगोणी , खरवंडी , तामसवाडी ,आदि गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून सोनई येत आहे.
जिल्हा विभाजन नंतर नेवासा तालुक्यात चे विभाजन झाल्यास सोनई या नवीन तालुक्याची निर्मिती व्हावी. अशी मागणी आता परिसरातील नागरिक करू लागले आहेत.
दळणवळणाच्या दृष्टीने शासकीय कामे या दृष्टीने सोनई हे शहर या गावांसाठी कमी अंतराचे आहे त्याचबरोबर सोनई शेजारी असलेल्या राहुरी तालुक्यातील काही गावे ही सोनईला जोडल्यास सोनई हा एक मोठा तालुका होऊ शकतो.
सोनई तालुका निर्माण करून तो दक्षिण नगर जिल्हा जोडण्यात यावा अशी मागणी आता ग्रामस्थ करू लागले आहेत .सोनई जवळच असलेल्या शनिशिंगणापूर मुळे या परिसरात दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
शनिशिंगणापूरच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर देशातूनही लोक या ठिकाणी येतात. त्यामुळे या परिसराला शनिशिंगणापूर मुळे मोठे महत्व प्राप्त झाले आहे. विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांनी शनिशिंगणापूर देवस्थानचे सुशोभीकरण तसेच पानस नाल्याचे सुशोभीकरण केल्यामुळे या परिसराचे रूप पालटले आहे.
सोनई तालुका झाल्यास या परिसरात आणखी दळणवळण वाढून रोजगार उपलब्ध होतील. असे बोलले जात आहे .नेवासा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. त्यामुळे त्याचे विभाजन झाल्यास सोनई हे नवीन तालुक्यासाठी ठिकाण योग्य होईल असे ग्रामस्थांचे मत आहे.
सोनई तालुका झाल्यास विविध शासकीय कार्यालय त्या ठिकाणी येथील त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थानच्या नियोजनासाठी शासकीय स्तरावर सोयीचे होणार आहे त्यामुळे जिल्हा विभाजनात नवीन तालुक्याची निर्मिती करताना सोनई तालुका व्हावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
Post a Comment