यंदा आषाढी एकादशीमुळे कुर्बानी नाही.... हिंदू बांधवासाठी मुस्लिम बांधवाचा निर्णय....


चांदा  ः
  सर्वधर्मसमभावाबरोबरच हिंदू मुस्लिम ऐक्याचे ऋणानुबंध असलेल्या नेवासा तालुक्यातील चांदा येथील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेत आपण सारे एक आहोत हे दाखवून दिले आहे . हिंदू बांधवांनीही या निर्णयाचे स्वागत करत मुस्लिम बांधवांना धन्यवाद दिले.


गुरुवार २९ रोजी पवित्र आषाढी एकादशी आहे. त्याच दिवशी बकरी ईद आहे. बकरी ईदला मुस्लिम बांधव कुर्बानी देऊन सण साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र आषाढी एकादशी हिंदू बांधवाची अत्यंत पवित्र एकादशी असल्याने या वर्षी त्या दिवशी कुर्बानी न देता सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 


आज याच सर्दभात सोनई पोलिस स्टेशनचे स. पो . नि . माणिक चौधरी आणि गावच्या सरपंच सुनंदाताई दहातोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदा ग्रामपंचायत कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला यावेळी सपोनि माणिक चौधरी यांचा शांतता कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

सपोनि माणिक चौधरी गावच्या सरपंच सुनंदाताई दहातोंडे, यांनी आपल्या मनोगतातून सर्वांनी शांतता व एकोप्याने राहून सर्वधर्मसमभाव टिकवून गावचा लौकिक वाढवावा असे आवाहन केले. 
\
कार्यक्रमासाठी नाथा जावळे, पोलिस पाटील कैलास अभिनव , हमिदभाई शेख ,सादिक शेख , प्रकाश  कटारीया,,ग्रा. सदस्य, संतोष गाढवे, बाळासाहेब पूंड़ ,कार्तिक पासलकर,दिपक दहातोंडे,देवीदास पासलकर, शकुरभाई शेख, शकिलभाई शेख,सलींमभाई शेख, सूभान शेख ,रशीदभाई सय्यद ,ग्रा. सदस्य बशीरभाई शेख,शफ़ी जहागिरदार, शकुरभाई शेख , सुभाष शिंदे व  सर्व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post