नगर : वृध्द महिलेच्या बॅगमधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 42 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. मंगळवारी (ता. 12) दुपारी पावणे दोनच्या सुमारास ख्रिस्त गल्ली येथील महाराजा वडापाव दुकानासमोर ही घटना घडली.
या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पा वसंत शिंदे (वय 68 रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्या मंगळवारी दुपारी ख्रिस्त गल्लीत आल्या होत्या.
त्या पावणे दोनच्या सुमारास महाराजा वडापाव दुकानासमोर असताना त्यांच्या बॅगमधील साडे सात ग्रॅमची सोन्याची मोहनमाळ व 20 हजार रूपये रोख रक्कम असा 42 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी काढून घेतला.
फिर्यादी यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. अधिक तपास पोलिस अंमलदार बनकर करीत आहेत.
Post a Comment