पारनेर : पारनेर-नगर मतदारसंघातील विविध देवस्थानांमध्ये विकास कामांसाठी ९ कोटी ९९ लाख रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
मंजूर झालेल्या निधीमध्ये अकोळनेर ता. नगर येथे खंडोबा देवस्थान परीसरात बहुउद्देशीय हॉल बांधणे ९९ लाख, अरणगांव ता. नगर येथे बुवाजी परिसरात बहुउद्देशीय हॉल बांधणे १ कोटी, घोसपुरी ता. नगर येथे पद्मावती देवस्थान परिसरात बहुउद्देशीय हॉल बांधकाम ५० लाख.
करंदी, ता. पारनेर येथे मळगंगा देवस्थान परीसरात बहुउद्देशीय हॉल बांधकाम ७५ लाख, वडगांव दर्या, ता. पारनेर येथे दर्याबाई, वेल्हाबाई देवस्थान येथे बहुउद्देशीय हॉल बांधकाम ५० लाख, सावरगांव ता. पारनेर येथे हनुमान मंदिर देवस्थान परिसरात बहुउददेशिय हॉल बांधकाम ५० लाख.
भाळवणी ता. पारनेर येथे नागेश्वर देवस्थान येथे बहुउद्देशीय हॉल बांधकाम ७५ लाख, निघोज ता. पारनेर येथे कुंड रस्ता काँक्रीटीकरण करणे ६५ लाख, निघोज ता. पारनेर येथे मळगंगा देवी मंदिर परिसर सुशोभिकरण करणे ५५ लाख.
निघोज ता. पारनेर येथे मळगंगा देवी परिसर पर्यटन भोजन कक्ष बांधकाम करणे १ कोटी ३० लाख, निघोज ता. पारनेर येथे मळगंगा देवी परिसर पर्यटन विसावा केंद्र बांधकाम करणे २ कोटी ५० लाख यांचा समावेश आहे.
आ. नीलेश लंके यांनी देवस्थान विकासासाठी भरघोस निधी मंजुर केल्याबदल संबंधित गावचे ग्रामस्थ तसेच भाविकांकडून त्यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.
Post a Comment