कॉंग्रेस झाली श्रीगोंदा तालुका लिमिटेड....पदाधिकार्यांवर कार्यकर्ते नाराज.... पदे फक्त प्रसिध्दीसाठी....

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा ः  एकेकाळी श्रीगोंदा तालुका हा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. म्हणून की काय श्रीगोंद्याला काॅंग्रेस पक्षाने झुकते माप दिल्याचे सध्या दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष व युवक अध्यक्ष ही महत्वाची पदे श्रीगोंद्याला मिळालेली आहेत. त्यात आणखभीर कार्याध्यक्षपदाची पडलेली आहे. त्यामुे  कॉंग्रेस पक्ष हा श्रीगोंदा तालुका प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाल्याचे दिसून येते.


काॅंग्रेस पक्षाने श्रीगोंदा तालुक्याला भरभरून दिलेले आहे. त्यामुळे आगमी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा मिळवून काॅंग्रेसने आपले वर्चस्व येथे पुन्हा स्थापन करावे, अशी अपेक्षा काॅंग्रेस कार्यकर्त्यांमधून होत आहे. श्रीगोंद्यात काॅंग्रेसने एव्हढी महत्वाची पदे  दिल्यामुळे आता गावपातळीपासून ते जिल्हा परिषदपर्यंत सर्वच ठिकाणी आता काॅंग्रेने मिळवून आपले वर्चस्व सिध्द करणे गरजेचे  आहे.

पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या संधीचे सोने करून काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीगोंद्याबरोबरच पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नगर या तालुक्यांवर आपली पकड मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठी आता पदाधिकाऱ्यांनी या तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन पक्ष बांधणीसाठी प्रयत्न गरजेचे आहे. अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. परंतु सध्या काॅंग्रेसच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांकडून ठोस असे कोणतेच कामे होत नसल्याचे दिसून येत आहे. 

अहमदनगर शहराचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे काॅंग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ते विरोधकाची चांगली भूमिका नगर शहरात निभावत असून काॅंग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच प्रयत्न श्रीगोंद्यातील काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून व्हावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

काॅंग्रेसच्या महिला आघाडी कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. ही आघाडी वाढीसाठी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांच्याकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु त्यांनी अद्याप मोठे कार्यक्रम घेतलेले दिसून येत नाही. त्यांनी तालुके मेळावे घेऊन पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत महिला काॅंग्रेसच्या सदस्यांमधून व्यक्त केले जात आहे. याबाबत काॅंग्रेस गटात दबक्या आवाजातील चर्चा नागवडे यांच्या कानी पडूनही त्या प्रयत्न करीत नसल्यामुळे आश्रर्य व्यक्त केले जात आहे.

परिणामी श्रीगोंद्यासह जिल्ह्यात सध्या काॅंग्रेस पक्ष हा श्रीगोंद्या पुरता मर्यादीत असून फक्त पदे घेऊन आपली वैयक्तीक प्रसिध्दी मिळविण्यासाठीच राहिला असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झालेली आहे. ही चर्चा थांबविण्यासाठी आता मुख्य पदाधिकारी यांनी पक्षाची ध्येयधोरणे वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post