नगर : स्वस्तिक चौकात वर्षानुवर्षांपासून बसविण्यात येत असलेल्या गणेश मंडळावरून वाद निर्माण झाला होता. दोन मंडळांमधील वाद सोडविण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे. दोन्ही मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने वाद मिटला आहे. स्वस्तिक चौकात काही अंतरावर दोन्ही मंडळे गणपती बसविण्यासाठी तयार झाले आहेत.
जनजागृती प्रतिष्ठानचे अनिल शिंदे आणि राजयोग प्रतिष्ठानचे सागर शिंदे यांच्यात स्वस्तिक चौकातील गणपती मंडळावरून वाद निर्माण झाला होता. वाद आता मिटला असून स्वस्तिक चौकामध्ये काही अंतरावर दोन्ही मंडळांकडून गणपती बसविण्यात येणार आहे.
वाद असलेल्या स्वस्तिक चौकामध्ये पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वेळोवेळी भेटी दिल्या होत्या.
कोतवाली पोलिस ठाण्यात हा वाद सोडविण्यासाठी बैठकीही झाल्या होत्या. दोन्ही मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेऊन काही अंतरावर गणपती बसविण्यासाठी निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही सूचना पोलिस प्रशासनामार्फत दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
पोलिस प्रशासनाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून योग्य तोडगा काढल्याबद्दल दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिसांचे आभार मानले आहेत. यावेळी गोपनीय विभागाचे राजेंद्र गर्गे, योगेश खामकर, देवेंद्र पांढरकर हजर होते.
Post a Comment