चांदा : नागपूर येथे कल्चरल फौंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मुळा एज्युकेशन सोसायटी यश ॲकॅडमी व मुळा पब्लिक स्कूल सोनईच्या विद्यार्थ्यांनी समुह नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. तसेच यश ॲकॅडमीची
कार्तिकी संधान व मुळा पब्लिक स्कूलच्या अक्षरा शिंदे या विद्यार्थिनीने वैयक्तिक नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
या स्पर्धेमध्ये यश ॲकॅडमी गार्गी गडाख, हर्षदा वाघ, श्रद्धा बनकर, सकीना गोलंदाज, कार्तिकी संधान, माही चंदेल, आनंदी लोळगे, आलिया शेख, तनाज सय्यद, श्रावणी व्यव्हारे, रिद्धी पालवे, सिद्धी पालवे, व मुळा पब्लिक स्कूलच्या अक्षरा शिंदे, आरती जावळे, गौरव माळी, गौरव तांबे, शुभांगी गुंडाळे, जिया शेख , ऋतुजा डफाळ , शिवानी लकडे , अनुष्का साळवे , सायली माळी , ऋतुजा जाधव , वेदिका दरंदले , कृतिका गुंजाळ , अवनी मिरीकर या विद्यार्थिनीनी सहभाग घेऊन आपले कलागुण सादर केले.
या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख व सर्व संस्था पदाधिकारी यांनी केले. या विद्यार्थ्याना यश अकॅडमी व मुळा पब्लिक स्कूलच्या प्राचार्य, उपप्राचार्य व नृत्य शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते नागपूर येथे झालेल्या नॅशनल नृत्य स्पर्धेत यश ॲकॅडमी व मुळा पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला.- उदयन गडाख, उपाध्यक्ष, मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई
Post a Comment