चांदा ः देव देवतांच्या, संत महात्म्यांच्या दर्शनाने मनुष्य जीवन धन्य होते .दर्शनाने आत्मिक समाधान आणि उर्जा मिळते. त्यामुळे प्रत्येकाने नित्यपुजा बरोबरच धार्मिक कार्यात सहभागी व्हावे. असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी केले .
नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथील श्री खंडोबा मंदिर जिर्णोध्दार तसेच मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे त्या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यास गडाख यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले . त्या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ भाविकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
आजच्या युवकांमध्ये धार्मिकतेची जागृतता होत असल्याने पिढी सुसंस्कारी होत आहे . त्यातूनच गावाची उन्नती होणार आहे असेही त्या म्हणाल्या या प्रसंगी गावातील शिक्षक रावसाहेब फुंदे,भानुदास चांगुलपाई, उपसरपंच राजेंद्र बोरुडे, सरपंच पोपट माळी, पो . पा . विठ्ठल चांगुलपाई,दत्तात्रय फुंदे,पोपटराव शेकडे,सुभाष फुंदे,कारभारी फुंदे,आसाराम फुंदे,मनोहर बुळे,आप्पासाहेब बुळे,शंकरराव आव्हाड,रामनाथ फुंदे,राहुल फुंदे,अशोक बुळे,नंदकुमार फुंदे,नंदकुमार सानप, सतीश बुळे,संपतराव बुळे,वसंतराव भागवत,शंकरराव भागवत,संजय आढाव, विठ्ठलराव सानप,भाऊसाहेब सानप,खंडेराव भागवत,रामभाऊ भागवत,अंकुशराव फुंदे,शहादेव फुंदे,संजय फुंदे,एकनाथ साळवे,रामदास चांगुलपाई,महिलासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment