प्रीतमताईंना उचलून निवडणूक लढविणार नाही....

बीड : मी जगात कुठेही निवडणूक लढवेल, पण प्रीतमताईंना उचलून निवडणूक लढणार नाही’, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमेचा आज बीडमध्ये समारोप झाला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना पंकजा यांनी खासदारकी लढवण्याबद्दल खुलासा केला.

‘‘मी भाषण स्पष्ट केलं आहे, मी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे. मी कुणाला उचलून तिथे बसणार नाही, मग ती माझी बहिण असेल, प्रीतम मुंडे या दहा वर्ष खासदार राहिल्या आहेत. एकदम त्यांना घरी बसून मी खासदार व्हावं असं काही होणार नाही. 

मी असा निर्णय घेऊ शकत नाही आणि दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. कारण असा निर्णय आणि कुठे चर्चा माझी पक्षातील वरिष्ठांशी झाली नाही. पण हा माझा निर्णय झालेला आहे. मी जगात कुठेही निवडणूक लढवेल, पण प्रीतमताईंना उचलून निवडणूक लढणार नाही’, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post