श्रीगोंदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमदार बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त काष्टी येथे दि. शुक्रवारी (ता. आठ) रोजी परिक्रमा कॉलेज,काष्टी व रोटरी क्लब दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने परिक्रमा कॉलेज काष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी व दादांवर प्रेम असणाऱ्या युवकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याचे पुण्य कर्म करावे,असे आवाहन ॲड. प्रतापसिंह पाचपुते यांनी तालुक्यातील युवकांना केले आहे.
तसेच नऊ सप्टेंबर २०२३ रोजी आमदार मळा काष्टी येथे भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडी व श्रीगोंदा डॉक्टर असोशियशन (इम्पा) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात तपासणी केलेल्या सर्व रुग्णांना मोफत औषधे दिली जाणार आहेत.
यावेळी कार्यकर्त्यांनी येताना सत्कारासाठी शाल, श्रीफळ, फेटा, हार, तुरे, बुके आदी साहित्य न आणता ज्या व्यक्तिला गरज आहे, अशा किमान एका व्यक्तिस मोफत आरोग्य तपासणी शिबिरात घेऊन यावे असे आवाहन आ.पाचपुते यांनी केले आहे.
नऊ सप्टेंबर २०२३ रोजी आमदार बबनराव पाचपुते संपूर्ण दिवसभर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा व प्रेमाचा स्विकार करण्यासाठी आमदार मळा काष्टी येथिल निवासस्थानी उपस्थित असतील.
यावेळी शासकीय पातळीवर निवडलेल्या दिव्यांग व्यक्तिंना खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप केले जाईल. तसेच शिबिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस एक झाड स्नेहभेट म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.
Post a Comment