साजन पाचपुते यांचा उध्दव ठाकरे गटात प्रवेश.....

नगर : श्रीगोंद्याचे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे, काष्टी गावचे लोकनियुक्त सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साजन सदाशिव पाचपुते यांनी सोमवारी मुंबई येथे शिवसेनेत (उध्दव ठाकरे गटात) प्रवेश केला. प्रवेशानांतर लगेच त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी वर्णी लागली आहे.


पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या हस्ते पाचपुते यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी त्याच्या कुटुंबासह तालुक्यातील युवक कार्यकर्ते मोठया संख्येने मुंबईत उपस्थित होते. साजन पाचपुते यांनी समर्थकासह मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.

साजन पाचपुते हे मागील काही दिवसांपासून कोणत्या पक्षात जायचे याबाबत चाचपणी करत होते. मागील आठवड्यात त्यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, खा. राऊत यांची भेट घेतली होती. 

आता त्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला असल्याने तालुक्यातील ठाकरे गटाला भक्कम आधार मिळणार आहे. पाचपुते यांना उपनेतेपद ठकारे गटाकडून उपनेते बहाल केल्याने आता दक्षिणेत शिवसेनेला युवा चेहरा मिळाला आहे.

साजन पाचपुते यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात आपली सत्ता पुन्हा आण्यासाठी साजन पक्षात आले आहेत, मला आनंद आहे. ते सहकुटुंब शिवसेनेत आले आहेत. 

त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला आहे, तो आलाच पाहिजे. राजकारणात अशी पद्धत आहे, की सगळे सत्तेच्या बाजूने जातात. मात्र, साजन हे सत्ता आण्यासाठी आपल्याकडे आले आहेत.

आपल्याला आता संपूर्ण राज्यात फिरायचे आहे. त्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे उपनेतेपद दिली, असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. आपले ठरले होते, प्रवेश झाला की, श्रीगोंद्यामध्ये सभा घ्यायची आहे, मी सभेला येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post