पाऊस जोरदार होणार....

मुंबई : येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. येत्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 


संपूर्ण ऑगस्ट महिन्यात दडी मारल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं. सलग दोन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा सरी कोसळल्या. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने राज्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. सध्या राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, खरीप हंगामातील पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची गरज आहे. अजूनही काही भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.

अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल. 

मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. येत्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

१५ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस सोमवार १८ सप्टेंबपर्यंत राज्याच्या विविध भागात सुरू राहील, असा असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post