शिंदेसह ते आमदार अपात्र.....

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी गुरुवारी सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जवळपास लिहून दिला आहे.

आता फक्त सुनावणीसाठी अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरच याचा निकाल लागेल असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. हे 16 आमदार अपात्र ठरणार असून सरकार वाचवण्यासाठीच भाजपने राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप त्यांनी केला.

अनिल परब पंढरपूरला दर्शनासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली असून पूर्णपणे अर्थ लावूनच पाठवले आहेत. आता फक्त निर्णय घेणे बाकी आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post