नागवडे यांची भाजपच्या तालुकाध्यक्ष पदी फेरनिवड... सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यात उत्साह...

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून संदीप नागवडे यांनी  मागील कार्यकाळात पक्षाचे ध्येयधोरणे राबवताना सर्वसामान्य कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून अतिशय चांगले काम केले आहे. म्हणून पक्षाने पुन्हा त्यांची तालुकाध्यक्ष पदी फेर निवड केली आहे. 


संदीप नागवडे हे पदवीधर असून कार्यकर्ते कसे जपायचे याचा पूर्ण अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांनी  अतिशय चांगले काम करताना आमदार बबनराव पाचपुते यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले नागवडे यांच्या निवडीबद्दल आमदार बबनराव पाचपुते, खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी नागवडे यांचे अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post