विवाहितेची बदनामी... राहुरीतील एकास अटक

नगर : लग्नापूर्वी रिलेशनशिपमध्ये असताना काढलेले फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवून विवाहितेची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात माहेर असलेल्या पीडित विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रावसाहेब एकनाथ तुपे (रा. टाकळीमियाँं ता. राहुरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहेत. ही घटना 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता फिर्यादी विवाहिता माहेरी असताना घडली असून गुन्हा 9 सप्टेंबर रोजी रात्री दाखल झाला आहे. लग्न होण्यापूर्वी फिर्यादीची तुपे याच्यासोबत ओळख होती. 

ते रिलेशनशिपमध्ये असताना तुपे याने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादीचे फोटो काढले होते. 8 सप्टेंबर रोजी फिर्यादी माहेरी आल्यानंतर तुपे याने त्याच्या मोबाईल नंबरवरून फिर्यादीच्या भावाच्या व इतर नातेवाईकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर सदरचे फोटो पाठविले. सदरचे फोटो पाहून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तसेच फिर्यादीची समाजामध्ये व नातेवाईकांमध्ये बदनामी केली आहे. 

भेटली नाही तर बदनामी करण्याची धमकी देत शिवीगाळ केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सदरचा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार टेमकर अधिक तपास करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post