राष्ट्रवादीची गणेश मंडळांवरही ताबेमारी -किरण काळे


नगर ः
मनपा आयुक्त शहर लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली आहेत. ३५ - ४० वर्षे जुन्या मंडळांच्या दिलेल्या परवानगी रात्रीतून रद्द केल्या जातात. ज्या मंडळांची नोंदणी नाही अशा मंडळांना सर्व नियम अटी डावलून परवानग्या दिल्या जातात. शहरामध्ये जमिनीवर ताबेमारीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत. आता तर थेट गणेश मंडळांवरही राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू झालेली ताबेमारी गणेश उत्सव काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी काँग्रेससह आंदोलनामध्ये सहभागी झालेले सर्वपक्षीय भक्कमपणे उभे राहतील, अशी प्रतिक्रिया शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post