श्रीगोंद्यात आगामी विधानसभा उमेदवार कोण यावर चर्चा

श्रीगोंदा ः विधानसभा निवडणूक अजूनही अवधी असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी गटाकडून आमदार राहुल जगताप यांचे नाव फायनल मानले जात असून भाजपतर्फे आमदार बबनराव पाचपुते की त्यांच्या कुटुंबातील इतर कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक या वेळी चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत घनश्याम शेलारही आवाहन देणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस होणार आहे. त्यामुळे विकास कामांबरोबरच जनसंपर्क ही या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. पक्षापेक्षा व्यक्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीची लढत होणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु झालेली आहे. 

राष्ट्रवादी,बीआरएसचे उमेदवार निश्चित जाहीर झालेले आहेत. मात्र भाजपतर्फे पाचपुते कुटुंबियातून कोण उभे राहणार हे गुलदस्त्यात आहे. आमदार बबनराव पाचपुते तब्बेतीमुळे आगामी निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यांच्याऐवजी मग विक्रम पाचपुते की प्रताप पाचपुते उभे राहणार अशी चर्चा सध्या सुरु झालेली आहे. या दोघांना डावलून प्रतिभा पाचपुते निवडणुकीच्या  आखाड्यात उतराव्यात, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून होत आहे.
 
जगताप गटाकडूनही आगामी विधानसभा निवडणुकीत प्रणोती जगताप यांनी उमेदवारी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रणोती जगतापही सध्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेत आहेत. त्यामुळे जगताप गटाकडून  ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभेच्या अगोदर  जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाल्यास या दोन्ही विधानसभेच्या उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरून या भागाचे नेतृत्व करणार आहे. या दोन्हीही उमेदवार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

माजी आमदार राहुल जगताप हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे जगताप व पाचपुते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरतील हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post