पुणे : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या घेत जीवन संपवलं आहे. आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली.
जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे हा हा या अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. रविवार( 10 सप्टेंबर) ला सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्या प्रकरणामुळे कर्जतमध्ये वातावरण तणावग्रस्त बनलेले आहे.
Post a Comment