नगर ः लग्न केले नाही तर इन्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा तरूणाने विनयभंग केला. ही दि. 24 रोजी दुपारी 4 वाजता शहरातील एका महाविद्यालय परिसरात घडली.
याबाबत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून गौरव नितीन भिंगारदिवे (वय 19, रा. भूतकरवाडी, नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी बारावीत सायन्स विभागात शिक्षण घेत आहे.
24 रोजी दुपारी 4 वाजता ती महाविद्यालयाच्या बगीच्याच्या बाहेर उभी असताना एक वर्षापूर्वी ओळख झालेला गौरव भिंगारदिवे हा तिथे आला. तुला माझ्यासोबत बोलायचे नाही का? असे तो म्हणाला. त्यास नकार दिल्याने तो म्हणाला की, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे.
तु जर मला नकार दिला तर आपण दोघांनी सोबत काढलेले फोटो इन्टाग्रामवर व्हायरल करील, अशी धमकी देत हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच यापूर्वी त्याने माझा पाठलाग करून मला व माझ्या आईवडिलांना फोनवर मेसेज करून माझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणून त्रास दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Post a Comment