नेवासा ः तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या गुप्त हालचाली सुरु झालेल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासून मोर्चेबांधणीला सुरवात करण्यात आलेली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपला निर्विवाद वर्चस्व मिळावे, यासाठी सर्वचांचे प्रयत्न राहणार असून आतापासून योग्य उमेदवार कोण असेल याचे आडाखे बांधले जात आहे.
राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पहिल्या पेक्षा आता जोमाने तालुक्यातील संपर्क वाढविला आहे. कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नेते व कार्यकर्त्यांच्या भरी भेटी देत आहे.
मतदारसंघातील मतदारांच्या दहावे, तेरावे, लग्नसमारंभ आादी सुख, दुःखाच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरवात केलेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तेच उमेदवार असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या दृष्टीने मुरकुटे यांनी तालुक्यात आपला संपर्क आतापासून वाढविला असल्याचे दिसून येत आहे.
भाजपने उत्तर जिल्ह्याची जबाबदारी विठ्ठलराव लंघे यांच्यावर सोपविलेली आहे. त्यामुळे आगामी काळात तेही भाजपकडून उमेदवार असण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. लंखे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा लंघे समर्थकांमधून मधून व्यक्त होत आहे. त्यातच लंघे यांनही तालुक्यात संपर्क वाढविलेला आहे. त्यामुळे आगामी काळात लंघेही भाजपकडून उमेदवार असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
आमदार शंकरराव गडाख हे आपल्या पदाच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामे करीत असली तरी अनेक ठिकाणी त्यांच्यावर नाराजी असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. गडाख यांना भेटण्यासाठी त्यांच्या भोवती असलेला गोतावळा त्यांना भेटून देत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांसह जनतेतून होत आहे. त्यामुळे त्यांना आगामी निवडणूक तशी अवघड जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी सभापती सुनीता गडाख व युवा नेते उदयन गडाख यांनी तालुक्यात जनसंपर्क अभियान जोरदार सुरु आहे. बचतगटाच्या माध्यमातून सुनीता गडाख यांनी तालुक्यात महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा महिलांना आर्थिक स्तर उंचावण्यास झालेला आहे. या महिलांची शक्ती गडाख यांच्या मागे कायम राहणार आहे.
उदयन गडाख यांनी तालुक्यात संपर्क अभियान सुरु केलेले आहे. धार्मिकसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी तालुक्यात तरुणाईची एक फळी उभी केलेली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उदयन गडाख उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त
Post a Comment