राहुरी ः तालुक्यात सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी आ.प्राजक्त तनपुरे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन निवेदनही दिले.
आमदार तनपुरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेत, राहुरी तालुका क्रीडा संकुलास निधी मंजूर करण्याबाबत पत्र दिले.
राहुरी तालुक्यातील युवकांना सर्व क्रीडा प्रकारासाठी सुसज्ज असे क्रीडा संकुल व्हावे, आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रत्येक खेळाचे योग्य प्रशिक्षण व प्रशिक्षक मिळावे, यासाठी सर्वसोयी सुविधांयुक्त तालुका क्रीडा संकुलासाठी मी आग्रही आहे. आज क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांसमवेत याबाबत सकारात्मक चर्चा झाली, लवकरच या संकुलाच्या जागेची निवड, आराखडा या कामास सुरुवात होईल.
Post a Comment