नगर ः शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ८ सप्टेंबरला नगर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करणार आहेत. यावेळी संगमनेर व पुणतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गट नगर जिल्ह्यात ताकदीने उतरणार आहेत. गेल्या काही दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने या भागातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे या भागातील दुष्काळाच्या परिस्थतीची पाहणी उद्धव ठाकरे हे करणार आहेत.
यावेळी संगमनेर व पुणतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभा जागेसंदर्भात काही राजकीय चर्चा होणार का याची सर्वांना उत्स्कुता लागली आहे.
Post a Comment