पुरस्कार्थींच्या शिक्षकांचे गुण जाहीर करा....

नगर ः दरवर्षी देण्यात येणार्‍या तालुकानिहाय 14 जिल्हा शिक्षक पुरस्कारांची निवड झाली असून त्यांची नावे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेली आहे. परंतु या नावांची चर्चा होण्याऐवजी परीक्षेला बसलेल्या शिक्षकांच्या गुणांचीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झालेली आहे. पुरस्कारासाठी ज्या शिक्षकांनी लेखी परीक्षा दिलेली आहे. अशा सर्व शिक्षकांचे गुण जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी होत आहे. 


जिल्हा शिक्षक पुरस्कारसाठी मागील पंधारवाड्यात प्राथमिक शिक्षकांची लेखी परीक्षा घेण्यात आलेल्यानंतर परीक्षा परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या माहितीचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात आले. त्यानंतर संबंधीत शिक्षकांना परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे पाठवण्यात आली होती. 

तालुकानिहाय मिळालेले गुण आणि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुण यांची एकत्रित बेरीज केल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवलेल्या शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून अंतिम मान्यतेसाठी 14 शिक्षकांची नावे मान्यतेसाठी विभागीय महसूल आयुक्त यांना पाठवण्यात आली आहेत.

दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यात चांगले काम करणार्‍या प्राथमिक शिक्षाकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात येते. यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 14 शिक्षकांची निवड करण्यात येते. यासाठी संबंधीत शिक्षकांनी भरून दिलेल्या माहितीची क्रॉस पडताळणी करण्यात येते. 

या पुरस्कारासाठी शिक्षकांनी राबवलेले विविध उपक्रम, शैक्षणिक ब्लॉग, वेबसाईटची निर्मितीवर त्यावर केलेले लिखान, शैक्षणिक युटूब चॅनलची निर्मिती, वेगवेगळ्या पातळीवर प्रकाशीत केलेले विविध शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सहल, इस्त्रोसहल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढसाठी केलेले विविध प्रयोग, इंग्रजी माध्यमातून झेडपीच्या शाळेत विद्यार्थी येण्यासाठी केलेले प्रयोग यासह अन्य शैक्षणिक कामगिरी याचे मुल्यमान या पुरस्कारासाठी करण्यात येते.

यासाठी 100 गुण असून यासह 25 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु या परीक्षेत अवघे सहा गुण मिळवणारे शिक्षक प्रथम आल्याची चर्चा सध्या जिल्हयात सुरु आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने लेखी परीक्षा घेतलेल्या सर्वांचे गुण जाहीर करावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post