नगर ः बोल्हेगाव येथील चक्रधर स्वामी विद्यालयात विद्यार्थ्यांनी वृक्षास राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. या वेळी विद्यार्थ्यांनी वृक्षतोड न करण्याची व वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.
या वेळी विद्यार्थीनींनी झाडाला राखी बांधली. मुख्याध्यापक मनीषा कासार यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी ज्योती इथापे राणी सातपुते, वर्षा कोकाटे,सीमा फुंदे,अश्विनी सप्रे,अश्विनी झावरे, घालमे मॅडम ,शेळके मॅडम,आदेश शिरोळे आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे मुलांना वृक्षसंवर्धनाचे महत्व समजले आहे. त्याचा आगामी काळात निश्चितच फायदा होणार आहे.
Post a Comment