आजकाल काहींना आमदारकीचे स्वप्नं पडू लागली....


पारनेर : आज काल काहींना आमदार, खासदारकीची स्वप्नं पडू लागली आहेत. आज, उद्या तयार होतील अणि स्वप्न पाहतील. मात्र ते शक्य नाही. कारण त्याला उर्जा लागते, भाग्य लागते असे सांगत अर्जुन भालेकर यांनी राजकारणातील सद्य स्थितीवर भाष्य केले.


मोहटादेवीकडे प्रस्थान करण्यासाठी पारनेरच्या क्रीडा संकुलावर एकत्रित जमलेल्या माता-भगिनी गायल्या, नाचल्या आणि फुुगडयाही खेळल्या ! आ. लंके हे क्रीडा संकुलावर पोहचल्यानंतर महिलांनी लोकनेता मिळायचा नाय नीलेश लंके साहेबांसारखा या गितावर टाळया वाजवत, नाचत अनोखे स्वागत केले.

आ लंके हे भाषण करीत असताना एक वृध्दा आ. लंके यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न करीत होती, त्यावर आजी मघापासून पाया पडत आहे, आजीच्या डोक्यात असेल आजून दोन चार माळा घाल आणि जा हिमालयात ! मला महाराज करायचं डोक्यात आहे काय आजी ? असे सांगत आ. लंके यांनी यावेळी मिश्किली केली.  

पारनेरच्या क्रीडा संकुलावर आल्यानंतर तिथे  माईकवर गाणी म्हणण्यासाठी वयोवृध्द महिलांची चढाओढ लागली होती. कुणी मोहटादेवीचा महिमा गात होते तर कुणी आ. नीलेश लंके यांचे गोडवे गात होते. 


गाणी म्हणण्यासाठी माईकची अक्षरशः ओढाताण होत होती. अ‍ॅड. राहुल झावरे यांना मध्यस्ती करीत सर्व महिलांना संधी द्यावी लागत होती. गाणी म्हणतानाच काही आजीबाई ठेकाही धरत होत्या. 

ज्याला स्त्री ही मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा शाम झाला, बहिण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला, आई म्हणून समजली तो जिजाऊंचा शिवबा झाला आणि ज्याला स्त्री सुध्दा एक माणूस आहे. हे समजले तो पारनेर नगर तालुक्यातील माता-भगिनींचा लोकनेता झाला असे सांगत जितेश सरडे यांनी आ. लंके हे माता-भगिनींसाठी आयोजित करीत असलेल्या देवदर्शन यात्रेचे समर्थन केले. 

मोहटादेवीकडे प्रस्थान करण्यासाठी कान्हूर गटातील बसेस पारनेर येथील क्रीडा संकुलावर एकत्र येणार होत्या. नगराध्यक्ष नितीन आडसुळ, अर्जुन भालेकर, डॉ.विद्या कावरे, सुरेखाताई भालेकर , योगेश मते, बाळासाहेब नगरे, सुभाष कावरे ,बंडू गायकवाड , अमित जाधव , रमीज राजे , यांच्यासह इतर नगरसेवकांनी क्रीडा संकुल येथे माता-भगिनींसाठी चोख व्यवस्था ठेवली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post