पारनेर : नीलेश लंके प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी काँग्रेसयांच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या मोहटादेवी यात्रोत्सवातील तिसऱ्या दिवशी माता भगिनींच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मोहटादेवीकडे प्रस्थान करण्यासाठी पारनेरच्या क्रीडा संकुलावर एकत्रित जमलेल्या माता-भगिनी गायल्या, नाचल्या आणि फुुगडयाही खेळल्या ! आ. लंके हे क्रीडा संकुलावर पोहचल्यानंतर महिलांनी लोकनेता मिळायचा नाय नीलेश लंके साहेबांसारखा या गितावर टाळया वाजवत, नाचत अनोखे स्वागत केले.
यावेळी आ. लंके म्हणाले, इतके मोठे कुटूंब बरोबर घेऊन जात असताना थोडा फार त्रास होत असतो. पण थेट देवाच्या दारात जाऊन व्हीआयपी दर्शन घेतले तर देव कधी पावत नाही. मी आमदार असलो तरी व्हिआयपी दर्शनाचा आग्रह केला तरी लाईनमध्येच दर्शन घेतो.
देवापुढे छोटा मोठा कोणीच नसतो. सर्व भाविक सारखेच असतात. माता-भगिनींनी मोहटादेवी यात्रेचा आनंद घ्यावा, यात्रेत फेरफटका मारावा असे सांगतानाच यंदा रस्ता चांगला झाल्याने तुम्ही लवकर घरी पोहचणार आहात. यात्रेतील माता भगिनींच्या दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे ते म्हणाले.
युवा नेते जितेश सरडे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, मोहटादेवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आ. नीलेश लंके यांनी चार दिवस उपोषण केल्यामुळे आता आपण दिड तासात मोहटादेवी येथे पोहचणार आहोत.
नीलेश लंके नावाचे कुटूंब गेल्या एक महिन्यापासून या यात्रेचे नियोजन करीत असून माता भगिनींना उन्हापासून त्रास होत असल्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली.
यावेळी पारनेरचे नगराध्यक्ष नितीन आडसुळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, जितेश सरडे,दादा शिंदे, अॅड. राहुल झावरे, श्रीकांत चौरे ,महेंद्र गायकवाड, आर. आर.राजदेव, संदीप चौधरी, अनिल गंधाक्ते, विजय डोळ, डॉ.आबासाहेब खोडदे, सतीश पिंपरकर, अमित जाधव, माजी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, डॉ. विद्या कावरे, सुभाष कावरे आदी उपस्थित होते.
Post a Comment