आमदार नीलेश लंके युगपुरुष....

पारनेर : आमदार नीलेश लंके हे युगपुरूष आहेत. गोरगरीब जनतेची ते आहोरात्र सेवा करीत आहेत. माय माऊलींच्या आशिर्वादातून त्यांना मिळालेल्या उर्जेतून त्यांना हे शक्य होते आहे, असे प्रतिपादन अर्जुन भालेकर यांनी केले.


मोहटादेवीकडे प्रस्थान करण्यासाठी पारनेरच्या क्रीडा संकुलावर एकत्रित जमलेल्या माता-भगिनी गायल्या, नाचल्या आणि फुुगडयाही खेळल्या ! आ. लंके हे क्रीडा संकुलावर पोहचल्यानंतर महिलांनी लोकनेता मिळायचा नाय नीलेश लंके साहेबांसारखा या गितावर टाळया वाजवत, नाचत अनोखे स्वागत केले.

यावेळी पारनेरचे नगराध्यक्ष नितीन आडसुळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, जितेश सरडे,दादा शिंदे, अ‍ॅड. राहुल झावरे, श्रीकांत चौरे ,महेंद्र गायकवाड, आर. आर.राजदेव, संदीप चौधरी, अनिल गंधाक्ते, विजय डोळ, डॉ.आबासाहेब खोडदे, सतीश पिंपरकर, अमित जाधव, माजी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, डॉ. विद्या कावरे, सुभाष कावरे आदी उपस्थित होते.


भालेकर म्हणाले की, ही उर्जा लंके यांच्याकडे आहे. कोणीही आव आणून ते होणार नाही. ही सत्कर्माची दिंडी अशीच अखंडपणे सुरू राहणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post