पुणे ः मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. कर्जत-जामखेड विधानसभा लढविणार आहे, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे ते लोकसभा लढविणार या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आह.
कुकडी कालवा समितीच्या बैठकीसाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसी संवाद साधला. सध्या रोहित पवार लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर त्यांनी स्पष्ट आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे रोहित पवार लोकसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
रोहित पवार निवडणूक लढविणार नसल्याने मग त्यांच्या जागी कोण निवडणूक लढविणार यावर आता चर्चा सुरु झालेल्या आहेत. पवार यांना कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी प्रेम दिलेले आहे. या प्रेमात राहणेच त्यांनी पसंद केले असल्याची चर्चा सध्या या दोन तालुक्यात सुरु झालेली आहे. हाच खरा आपला नेता आहे, अशी चर्चाही आता कर्जत व जामखेड तालुक्यात सुरु झालेली आहे.
Post a Comment