पाथर्डी ः माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली भगवानगड दसरा मेळाव्याची परंपरा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी समर्थपणे सुरु ठेवली असुन यावर्षीचा दसरा मेळावा येत्या २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता संत भगवानबाबा यांची जन्मभुमी भगवानभक्ती गड सावरगाव (ता. पाटोदा जि. बीड ) येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार.
पाथर्डी तालुक्यातील सर्वच समाजातील भगवानबाबा भक्तांनी हाजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन पाथर्डी तालुका दसरा मेळावा कृती समीतीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दसऱ्याच्या दिवशी भगवानबाबा यांची जन्मभुमी सावरगाव येथे २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी पाथर्डी तालुका दसरा मेळावा कृती समीतीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, डॉ.मृत्युंजय गर्जे, धनंजय बडे, गोकुळ दौंड, अमोल गर्जे, संजय बडे, संजय किर्तने, मुकुंद गर्जे, राजेंद्र दगडखैर, नारायण पालवे, वामन किर्तने, प्रा. सुनिल पाखरे, नागनाथ गर्जे, राहुल कारखेले, पिराजी किर्तने परवेझ मणियार आदि उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले पाथर्डी शहर व तालुक्यातील सर्व समाजाच्या जनतेने लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात संत भगवानबाबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.
प्रत्येक गावातील युवक वृद्ध महिला यांनी स्वंय स्फुर्तीने मेळाव्यास उपस्थित राहुन मेळावा यशस्वी करून पंकजाताई यांचे हात बळकट करावे.यावेळी कृती समीतीच्या सर्वच सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. मेळाव्याबाबत जनतेत जागृती करण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी शहरात तसेच ग्रामीण भागात फलक लावण्यात यावेत, असे ते म्हणाले.
मेळाव्याचे फलक वेगवेगळे करण्याऐवजी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून आलेल्या डिझाईनचा वापर करून एकाच प्रकारचे फलक लावावेत. तसेच सोशल मिडीयावर सुद्धा जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी असेही यावेळी ठरले,
असे ते म्हणाले.
असे ते म्हणाले.
परवेज मण्यिार म्हणाले, तालुक्यातील मुस्लिम समाज लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेल्या संत भगवानबाबांच्या दसरा मेळाव्याला पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळाव्यासाठी दरवर्षी मोठ्या उपस्थित असतो. यावर्षी ही तालुक्यातील मुस्लिम समाज सावरगाव येथे दसरा मेळाव्याला जाणार आहे.
Post a Comment