माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

पाथर्डी ः  माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.  अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यात त्यांची प्रकृती खालावली. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले.  त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रतापराव ढाकणे यांचे ते वडील होत.


बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १९५१ मध्ये भेट घेतली होती.  हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन ठरले. गोवामुक्ती सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तसेच पाथर्डी तालुक्यातील विकासाबाबत विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली होती. बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले.  

पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा राहिला.  महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदा-या त्यांनी पार पाडल्या. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा राज्यमंत्री होते.  

Post a Comment

Previous Post Next Post