शिर्डी ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात हजार कोटी रुपायंचा विकास कामांचे भूमीपजून तसेच लोकर्पण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी विखे पितापुत्रांनी विशेष परिश्रम घेतले. त्यासाठी तालुकानिहाय आढावा बैठका घेतल्या.
कार्यक्रम काही अंशी यशस्वी पार पडला. मात्र या कार्यक्रमाच्या प्रसंगी व नंतर विखे पितापुत्रांच्या नावाची चर्चा होण्याऐवजी भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याच नावाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ते आगामी काळातील उमेदवार असू शकतात, असे भाजप कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिर्डी दौरा करून हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातीत दिग्गज नेते उपस्थित होते. या नेत्यांंमधून अक्षय कर्डिले यांची निवड करण्यात आली आहे.
शिर्डीत भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिपॅडवर स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनीही या स्वागताचा सहर्ष स्वीकार करीत शिवाजी कर्डिले यांच्याशी स्मितहास्य करीत संवाद साधला आहे. या संवादाचे फोटो समाज माध्यमावर चांगलेच व्हायरल झालेले आहेत.
कर्डिले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यामुळे आगामी काळात अक्षय कर्डिले मोठे नेतृत्व करतील, अशीच चर्चा सुरु झालेली आहे. कार्यक्रमस्थळावरील चर्चा आता जिल्हाभर झाली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आगामी काळात भाकरी फिरण्याची दाट शक्यता भाजपच्या गोटात केली जात आहे. ही भाकरी विधानसभेला फिरवली जाते की लोकसभेला याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अक्षय कर्डिले यांच्यासह काही तरुण कार्यकर्त्यांना पुढे आणले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात नक्कीच नाट्यमय घडामोडी घडतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Post a Comment