जिल्हा परिषदेत लाच घेताना एकास पकडले....

नगर : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील एका कर्मचार्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील  कारभाराच्या अनेक तक्रारी आहेत. याबाबत पदाधिकारी असताना अनेकदा वादंग झालेले आहे. टक्के घेतल्याशिवाय   कामे होत नसल्याच्या तक्रारी अनेकदा झाल्या आहेत. 

आज बांधकाम विभागात लाच घेताना एकाला पकडल्याने खळबळ उडाली आहे. या अगोदर शिक्षण विभागातही लाच घेताना एका महिला कर्मचार्याला अटक करण्यात आलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post