अतुल लहारे
नगर ः जिल्ह्यात एका सामाजिक कार्यकर्त्याने उपोषण सुरु केलेले आहे. या उपोषणामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. हे उपोषण सुरु होण्याअगोदर सामाजिक कार्यकर्त्याने व्हीडीओ करून तो समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. या व्हीडीओतून त्याने एका मोठ्या नेत्यावर टीका टिपन्नी केली असून सहा हजार पगाराने ठेवलेल्या काहींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
एका सामाजिक कार्यकर्त्याने गुरुवार (ता. 30)पासून उपोषण सुरु केलेले आहे. या उपोषणाची जिल्हाभरात खमंग चर्चा सुरु आहे. या उपोषणाअगोदर सामाजिक कार्यकर्त्याने व्हीडीओ तयार करून तो समाज माध्यमावर व्हायरल केलेला आहे. त्यामुळे त्या व्हीडीओची जिल्हाभर चर्चा सुरु झालेली आहे.
या व्हीडीओत सहा हजार रुपयाने काहीजण नोकरीला असल्याचे म्हटलेले आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील अनेकजण करीत आहेत. समाज माध्यमावर सध्या सहा हजाराचे गौडबंगाल काय असेच संदेश एकमेकांना टाकून या मागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या सहा हजाराबरोबरच काहीजण बिनपगारी व फुल अधिकारी असल्याची चर्चा सुरु झालेली आहे. हे बिनपगारी व फुल अधिकारी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नेत्याला बदनाम करीत असल्याची चर्चा आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ही मंडळी नेत्यांना भेटून देत नसल्याचे बोलले जात आहे.
Post a Comment