नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये कांद्याच्या सुमारे 97 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक साडेतीन हजारापर्यंतच भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याच्या 5645 गोण्यांची तर लाल कांद्याच्या 91848 गोण्यांची आवक झाली. यामध्ये गावरान कांद्याला 3500 तर लाल कांद्याला 3200 रुपयांचा भाव मिळाला. कांद्याला भाव मिळत असल्याने अनेकांनी कांदा विक्रीस आणला होता.
गावरान कांदा बाजार भाव ः एक नंबर ः 2900 ते 3500, दोन नंबर=2100 ते 2900, तीन नंबर ः 1300 ते 2100, चार नंबर ः 700 ते 1300.
लाल कांदा बाजार भाव ः एक नंबर ः 2600 ते 3200, दोन नंबर ः 1500 ते 2600, तीन नंबर ः 700 ते 1500, चार नंबर= 300 ते 700
Post a Comment