कोयता गँगला टायरमध्ये टाकून कारवाई करणार....

पुणे : पुण्यातल्या कोयता गँगचा सुपडा साफ करणार असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. आता पदर नाही, धोतर नाही डायरेक्ट टायरमध्ये टाकूनच कारवाई करणार असा सज्जड दमच अजित पवार यांनी भरला आहे. 


मागील काही दिवसांपासून कोयता गँगने पुण्यात धुमाकूळ घातला आहे. कोयता गँने पुण्यात मोठी दहशत पसरवली आहे. पोलिस वारंवार कारवाई करत असाताना देखील कोयता गँंगचे कारनामे सुरुच आहेत. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयता गँगला थेट धमकी दिली आहे. कोयता गॅंगवर कठोर कारवाईचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.  

प्रत्येक आई-बापानं आपल्या मुलांना नीट वागायला शिकवलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.  हुडकून काढून कारवाई करणार असा दमच अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रमात जाहीरपणे कोयता गॅंगला दम दिला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post