अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार...

श्रीगोंदा : श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना जेरबंद करत न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 


श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एका उमलत्या कळीवर वारंवार अत्याचार होत असल्याचा प्रकार पुढे आला.  यासंदर्भात गुन्हा दाखल होत दोन नराधमांना अटक करण्यात आली. या घटनेने केवळ श्रीगोंदा तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहे.

संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो, ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे. 

या घटनेचा सर्व तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे हे करत आहेत.

1/Post a Comment/Comments

  1. अशा लोकांना गुन्हा सत्य असेल तर फाशीची शिक्षा तुरंत द्यावी.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post