मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यापार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारसंघावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. अशातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अनेकजण निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
अहमदनगरमध्ये सध्या तसे बॅनर्स लागले असून यावर खासदार होणार असा उल्लेख करण्यात आला आहे. अहमदनगर लोकसभेची जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील निवडून आले होते.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची देखील मोठी ताकद आहे. त्यामुळे शरद पवार गटाने या जागेवर उमेदवार देण्यास तयारी दर्शवली आहे. अजित पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र, महायुतीत ही जागा भाजपच्या वाटेला जात आहे. अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
Post a Comment