नागपूर : जसं वारं वाहत तसंच उफनायचं असतं या म्हणीप्रमाणेच सध्या राजकीय नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत. भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे.आता काहीजण काँग्रेस सोडून शिवसेनेतही जात आहे.काँग्रेसला एका मागून एक धक्के बसत आहेत.
नांदेडनंतर मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे.
शिवसेना त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. राजू पारवे हे दीर्घकाळापासून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती.
नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही होते. परंतु त्यांनी भाजप मध्ये जाण्याऐवजी शिवसेनेने जाणे पसंत केले आहे. राज्यात सुरू असलेल्या पक्ष बदलाच्या हालचाली विशेष करून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
Post a Comment