मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेत बारामतीतून लोकसभा लढविण्याचा निर्णय माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कायम ठेवला आहे.
महायुतीमध्ये बारामतीची जागा - राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लोकसभेसाठी - मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली - आहे.
१२ एप्रिल रोजी १२ वाजता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. शिवतारे निवडणूक लढवतात की अर्ज माघारी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment