नगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला 1500 ते 1900 रुपये भाव मिळाला.
लिलावासाठी एकूण 103762 गोण्या कांद्याची आवक झाली. आवक काहीशी वाढली असली तरी भाव पूर्वीप्रमाणे खाली आले आहेत.
यात प्रथम प्रतीच्या कांद्यास 1500 ते 1900 रुपये, द्वितीय प्रतीस 900 ते 1500, तृतीय प्रतीस 500 ते 900, चतुर्थ प्रतीस 150 ते 500 रुपये भाव मिळाला.
शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment