नगर : जिल्हा परिषदेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे 50 कोटी 1 लाख 95 हजार 149 रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अंदाजपत्रक जाहीर केले.
जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उभारणी, मिशन आरंभ, सुरभि सुरक्षा अभियानासह एकुलती एक, लाडाची लेक, जलधारा अशा नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, समर्थ शेवाळे, राजू लाकूडझोडे, दादाभाऊ गुंजाळ, भास्कर पाटील, श्रीरंग गडधे, शरद दिघे, पांडुरंग गायसमुद्रे, संजय आगलावे, भगवान निकम, योगेश आंबरे, महेश कावरे आदी उपस्थित होते.
Post a Comment