नगर : शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये मार्केट यार्ड पोलीस चौकीच्या परिसरातच एका 62 वर्षाचा खून झाल्याची घटना घडली आहे.
बाळू विठोबा नागपुरे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
काही संशयित व्यक्तींना देखील कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. नेमकी ही घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून आरोपींना अटक करण्यात येणार आहे.
Post a Comment