अकोले : येथील कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोले मध्ये आज रविवारी रोजी कांद्याची 7413 गोणी आवक झाली आहे. एक नंबर कांद्याला 2011रुपयांचा भाव मिळाल.
अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लीलाव होत आहेत. शेतकरी वर्गाचे विक्रीस आलेल्या कांदा योग्य बाजार भाव मिळत आहेत. कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी दुपारी 1 ते रात्री 7.30 पर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत केले जाईल, याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी.
शेतकरी वर्गाने आपला शेतीमाल योग्य बाजार भाव, इलेक्ट्रॉनिक काट्यावर रास्त वजन,रोख पेमेंट मिळण्यासाठी बाजार समितीचे मुख्य बाजारात विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती भानुदासजी तिकांडे, उपसभापती रोहिदासजी भोर, बाजार समिती संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
Post a Comment