अकोले : तालुक्यातील समशेरपूरचे सूपुत्र (रहिवासी) तसेच शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांची महाराष्ट्र शासन आदेशान्वये जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन निर्णयात त्यांच्याबरोबरच इतर तीन जणांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांचे खंदे समर्थक म्हणून बाजीराव दराडे जिल्हा भरात परीचित आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणारे बाजीराव दराडे पक्षाची ध्येयधोरणे तसेच पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत कार्यरत असतात.
अकोले तालुक्यातील विविध विकास कामांसाठी सतत प्रयत्नशील असतात. मागील काही दिवसांत अकोले तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नांतून आणि बाजीराव दराडे यांच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र शासनाने 221कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने तालुका भरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत.
रस्त्यांच्या बरोबरच आढळा परिसरातील पिंपळदरावाडी,मोरदरी व इतरही छोट्या मोठ्या धरण प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून सदर प्रकल्पांसाठी निधी मिळवून देण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या वतीने त्यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
Post a Comment