जगभरातील फेसबुक डाऊन....

मुंबई : जगभरात फेसबुक आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक डाऊन झाले. याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही. इंस्टाग्राम देखील डाऊन झाले होते. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले आहेत.


फेसबुक वापरकर्त्यांना मोठा झटका बसला आहे. अनेकांचे फेसबुक इंस्टाग्राम बंद पडले आहेत. यामुळे फेसबुक इंस्टाग्राम वापरकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

नेमका हा प्रकार कशामुळे झाला याबाबत अद्यापही काही माहिती पुढे आलेली नाही. मात्र अनेकांनी आपल्या सोशल मीडियावरील फेसबुक व इंस्टाग्राम चालू करण्याबाबत अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र लॉगिन होत नसल्यामुळे अनेक जणांना आता चिंता लागलेली आहे. 

फेसबुक व इंस्टाग्राम वापरकर्त्यांची मोठी संख्या असल्यामुळे व याचा वापर सतत होत असल्यामुळे अचानक या दोन्हीही सोशल मीडियावरील साईट बंद झाल्यामुळे वापरकर्त्यांनामध्ये एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post