लोकसभेच्या आखाड्यात शेलार यांनी उतरावे....

नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून बीआरएसचे घनश्याम शेलार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. 


नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विकास व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांनी उमेदवारी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उमेदवारी केल्यासश्रीगोंदा तालुक्यातून भरघोस प्रतिसाद दिला जाईल, असेही कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

नगर तालुक्यातील साखळी प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. तो प्रकल्प मार्गी लागण्यासाठी शेलार यांच्यासारखे नेतृत्व लोकसभा मतदारसंघाला हवे आहे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून नियुक्ती केली जात आहे. शेलार यांनी निवडणूक लढवली तर त्याचा फायदा त्यांना होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post