गँसच्या दरात कपात....

नवी दिल्ली : महिलादिनानिमित्त केंद्र सरकाराने महिलांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. घरगुती सिलिंडरवर १०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे.


महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या दरात आम्ही 100 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच, शिवाय कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. 

हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळेच गॅसच्या दरात कपात केली असली की चर्चा सध्या सर्वसामान्यात सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post