सोन्यासह चांदी महागली....

मुंबई : मार्च महिन्यात सोन्यासह चांदीने कहर केला. मार्च महिन्यात 2890 तर चांदी दीड हजारांनी महागली आहे.


या महिन्यात सोने जवळपास 2900 रुपयांनी वधारले. तर या आठवड्यात 1600 रुपयांनी चढाई केली. 1 मार्चपासून ते 8 मार्चपर्यंत 2890 रुपयांनी सोने महागले. 

1 मार्चला 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वाढल्या. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 5 मार्च रोजी 700 रुपयांची वाढ झाली. 6 मार्च रोजी 250 रुपयांनी सोने महागले. तर 7 मार्च रोजी त्यात 400 रुपयांची भर पडली. 

8 मार्च रोजी किंमतीत 170 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मार्च महिन्यात चांदी जवळपास तीन हजारांनी वधारली. तर या आठवड्यात चांदीत 2100 रुपयांची वाढ झाली. 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 2 मार्च 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 3 मार्चला 1400 रुपयांची स्वस्ताई आली. तर 5 मार्च रोजी चांदी 1100 रुपयांनी महागली. 6 मार्च रोजी 200 रुपयांची स्वस्ताई आली. 

7 मार्च रोजी 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 8 मार्च रोजी तितकीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,500 रुपये आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post