आता ही अफवा कोणी पसरवली.... लंकेंना भाजप पाठिंबा देणार...

नगर : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवारी करणार याबाबत वावड्या उठवल्या जात आहेत. काल सकाळपर्यंत आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र त्यानंतर दुपारनंतर लंके यांनाभाजप पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू झाली आहेया वावड्या मोठ्या प्रमाणात उठवल्या जात आहेत.


खासदार सुजय विखे यांनी गेल्या पाच वर्षात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भरीभरून कामे केलेली आहेत. त्या कामाच्या बळावरच ते आगामी लोकसभा निवडणुकीत ते उमेदवारीवर दावा करीत आहेत. परंतु अद्याप त्यांचे उमेदवारी फायनल झालेली नाही. 

त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये यासाठी भाजप अंतर्गत काही गट सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे विखे यांना उमेदवारी मिळते की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातूनउमेदवारी मिळावी यासाठी भाजपातून अनेक जण इच्छुक आहेत या सर्वांनी वरिष्ठ स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. अद्याप या मतदारसंघातून कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. परंतु आता भाजप बरोबरच आमदार निलेश लंके यांचेही नाव आघाडीवर आलेले आहेत. 

निलेश लंके यांना आता पुरस्कृत करून या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  भाजपमधील कलह टाळण्यासाठीच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही अफवा आहे की सत्य आहे याबाबत साशंका व्यक्त केली जात आहे. 

भाजपाने लंके यांना उमेदवारी दिल्यासया मतदारसंघातून ते विजयी होतील. अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. उमेदवारी जाहीर केली जाईल तेव्हाच या मतदारसंघातील पूर्णविराम मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post